मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. रहाणे यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे आहे. रहाणे बाप झाल्याची आनंदवार्ता भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे दिली.
अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र. ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनेही जुळत गेली, नंतर त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले.