बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला. त्यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद लुटला. पर्यावरण दिनानिमित्त बारामती येथे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत अजित पवार यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद लुटला. विषेश म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले होते. येत्या तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा. अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजित पवारांनी थेट मैदानात येत विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला.