पुणे : विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरात राजकीय लढाईला प्रारंभ झाला आहे. इंदापूरच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात वाद पेटला आहे. ”इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे
”वाट्टेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीच घेणार, प्रसंगी आघाडी झाली नाही तरी चालेल अशा शब्दात अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला होता. गेल्या आठवड्यात इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार यांनी या जागेवर आपला दावा सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले.