सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून विवाहसोहळा आटोपून माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार परत जात असतांना सातारा रस्तावर एकाचा अपघात झाल्याचे त्यांचा लक्षात आले त्यांनी लागलीच गाडी थांबवून अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकारावरून अजित पवार यांच्या माणुसकीचे दर्शन झाले. रात्री ९ वाजता संतोष जाधव हे महाबळेश्वर सातारा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आले.
जाधव हे दुचाकीवरून जात असताना रानडुक्कराने अचानक धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. अजितदादांनी तातडीने स्वतःची गाडी थांबवून बेशुद्ध जखमी अवस्थेत असलेल्या जाधव यांना मदत केली. त्यांनी कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने उचलून स्वतःच्या गाडीमधून सातारा येथील क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालय येथे दाखल व्यवस्था केली आणि स्वतः फ़ोन वरून डॉक्टराना जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते