बलात्काराच्या आरोपावरून अकबर यांचे स्पष्टीकरण; परस्पर संमतीने संबंध ठेवल्याची कबुली

0

नवी दिल्ली- बलत्काराच्या आरोपावरून नुकतेच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी राजीनामा दिला. त्यांच्यावर पुन्हा एका महिला पत्रकाराने बलात्काराचा आरोप केला आहे. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा महिला केला आहे. दरम्यान आरोपांवर स्पष्टीकरण देताना एम.जे अकबर यांनी मात्र आपल्यातील शरीरसंबंध परस्पर संमतीने होते अशी कबुली दिली आहे.

‘1994 च्या आसपास मी आणि पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले. काही महिने हे संबंध टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या. इतकंच नाही तर माझ्या कुटुंबातही कलह निर्माण झाला. परस्पर संमतीने ठेवलेले हे संबंध नंतर संपवण्यात आले’. 29 ऑक्टोबरला वॉशिंग्टन पोस्टने माझ्या वकिलांना जवळपास 23 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत प्रश्नांची मालिकाच पाठवली. हे सर्व आरोप खोटे होते आणि फेटाळण्यात आले’, अशी माहिती एम जे अकबर यांनी दिली आहे.