। भुसावळ प्रतिनिधी । शहरातील टिंबर मार्केट नंदनवन कॉलनी परिसरातील श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित ) सेवा केंद्र तालुका केंद्र भुसावळ येथे दि. १२ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह काळात २४ तास प्रहर सेवा होणार असून त्यात अखंड वीणा वादन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन या सेवा अखंड चालणार आहेत. या सप्ताहात प्रतिनिधीक स्वरूपात हवन युक्त श्री भागवत पारायण, श्री गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती पारायण, श्री नवनाथ पारायण या
सेवा होणार आहेत. या सप्ताह मध्ये ग्राम व नागरी अभियान विकास अंतर्गत सेवा मार्गातील १८ ग्राम अभियानचे विविध स्टॉल लावण्यात येणार असून ग्राम अभियानाबद्दल मार्गदर्शन केंद्रात मिळणार आहे. भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता अंतर्गत वर्षभरातील सण उत्सव कसे साजरे करावे याची प्रक्तेक्षिक डेमो युक्त माहिती आपल्याला या सप्ताह काळात मिळणार आहे. या सप्ताह काळात जनकल्याण योजनेच्या माध्यमातून आरोग्य दुत अंतर्गत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी संकल्पना केंद्रात राबवण्यात येणार असून या सप्ताह काळात अनेक देवी देवतांचे हवन द्वारे सेवा करण्यात येणार आहे.
» ११ एप्रिल रोजी शहरातील ग्राम देवतांचा मानसन्मान व देवी देवता मंडळ मांडणे, १२ एप्रिल रोजी सकाळी स्थापित देवता हवन व अखंड प्रहर सेवेला सुरुवात करून नाम यज्ञ सप्ताह आरंभ १३ एप्रिल रोजी गणेश याग व मनोबोध याग, १४ रोजी नित्य स्वाहाकार व चंडीयाग, १५ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार श्री गीताई याग, १६ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार व स्वामी याग, १७ एप्रिल रोजी मल्हारी याग व रूद्र याग, १८ एप्रिल रोजी सप्ताहची सांगता होणार आहे.