अखिल भारतीय पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

0

भडगाव तालुकाध्यक्षपदी नितीन सोनार यांची निवड

कजगाव – अखिल भारतीय पत्रकार संघाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी कजगाव येथील पत्रकार नितीन सोनार यांची निवड करण्यात आली असुन कार्यकारणी देखिल जाहीर करण्यात आली.
भडगाव येथे अखिल भारतीय पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या जिल्हास्तरीय बैठकीत भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कजगाव येथील पत्रकार नितीन सोनार यांची भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर जिल्हास्तरावर भडगाव तालुक्यातून संजय कोतकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी व भानुदास महाजन यांची जिल्हाकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय महाजन भडगाव तालुकाउपाध्यक्ष सुनील पाटील सचिव प्रशांत पाटील सहसचिव, दिपक अमृतकार कार्याध्यक्ष, मनीष सोनवणे भडगाव शहर अध्यक्ष, किसन वराळे भडगाव शहर उपाध्यक्ष, अमित देशमुख भडगाव शहर सचिव, अजय कोतकर तालुका सल्लागार, आनंदा महाजन सल्लागार, रविंद्र पाटील तालुका संघटक, विलास पाटील सह संघटक, आत्माराम पाटील जेष्ठ सल्लागार, डॉ. बी. बी. भोसले सल्लागार, कैलास महाजन सल्लागार, संजय पाटील सल्लागार, आदींची निवड करण्यात आली. सर्व निवड ह्या बिनविरोध करण्यात आल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र कदम जिल्हाध्यक्ष भगवान सोनार जिल्हा उपाध्यक्ष ललित खरे, प्रमुख उपस्थिती जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील उपस्थित होते.