दिल्ली- बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आपल्या समाजकार्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. ते अनेक मार्गाने निराधारांना आधार देत असतात. दरम्यान त्यांनी त्यांच्या ‘रुस्तम’ या सुपरहिट चित्रपटात परिधान केलेल्या नौसेनेच्या वर्दीचा सामाजिक कार्यासाठी लिलाव करण्याच निर्णय घेतला आहे. त्याने लिलावही जाहीर केले आहे. या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेचा वापर मानवी कल्याणासाठी केला जाणार आहे.
अक्षयने नुकतच त्याच्या ट्विटवरुन हे घोषित केले आहे. अक्षयने एक फोटो ट्विट केला आणि लिहिले की, ‘रुस्तम या चित्रपटात मी परिधान केलेली वर्दी जिंकण्याची संधी. बोली २६ मे रोजी बंद होणार आहे. अक्षने पुढे लिहिलं की, ‘सर्वांना नमस्कार, मी ही घोषणा करताना उत्साहित आहे की, तुम्ही खऱ्याखुऱ्या नौसेनेची वर्दी मिळविण्यासाठी बोली लावू शकता. तीच वर्दी जी मी रूस्तममध्ये परिधान केली होती. ‘तुम्हाला ही वर्दी हवी असल्याच तुम्ही सुद्धा ही बोली लावू शकता.’