मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने याबाबत आदेश दिले आहे. 21 रोजी विधानसभा निवडणूक होत आहे, त्यानिमित्त कायदा व सुवस्थेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास परवाना कायमचा रद्द करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
21 रोजी राज्यातील 288 जागांसाठी मतदान होत आहे. 24 रोजी मतमोजणी होणार आहे.