मुंबईः वर्षभरानंतर कर्करोगावर उपचार करून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर पत्नी नीतूसह भारतात परतले आहेत. दरम्यान या आनंदात अभिनेत्री आलिया भट्ट जंगी पार्टी देणार आहे.ही पार्टी आलिया भट्टने तिच्याच घरी ठेवली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा दोघांनीही याला दुजोरा दिला आहे. अनेकदा दोघेही पार्टी फंक्शनमध्ये दिसतात. त्यामुळे दोन्ही लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. म्हणूनच होणारे सासरे सुखरूप घरी परतल्याने आलियाकडून पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये असताना अनेकदा आलिया रणबीरसोबत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलीया आणि रणबीरचे सूत जुळले. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आल्यानंतर रणबीरने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. लवकरच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.