अलिबाबाचे संस्थापक ‘जॅक मा’ सोमवारी घेणार निवृत्ती

0

बीजिंग- चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती व अलीबाबाचे निर्माते जॅक मा यांनी सोमवारपासून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीनंतर ते पूर्ण वेळ शिक्षण व समाजसेवेसाठी देणार आहे. त्यामुळे उद्या जॅक मा यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस असणार आहे.

इंग्रजीचे शिक्षक होते जॅक मा
१९९९ अलीबाबा ही ई-कॉमर्स कंपनी जॅक मा यांनी सुरु केली होती. त्याच्या अगोदर ते इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करीत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करत जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत स्थान मिळविले. शुक्रवारी स्टॉक प्राइसनुसार अलीबाबाची मार्केट वैल्यु 420.80 अरब डॉलर होते.

वाढदिवशी निवृत्ती

जॅक मा यांनी सोमवारपासून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी त्यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या निवृत्तीने चीनमधील व्यापार क्षेत्रात एका मोठ्या युगाचा अंत होणार असल्याचे बोलले जात आहे.