मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राजी सिनेमातील नवे गाणे दिलबरो प्रदर्शित झाले. या गाण्याबद्दल आलियाने ट्वीट करून दिलबरो गाण्याने मला रडवले असल्याचे सांगितले आहे. तसेच या गाण्याचे बोल अतिशय साधे पण भावनेने ओथंबलेले आहेत. हे गाणे पाहताना मला माझा हात धरलेल्या वडीलांची आठवण आली. ही पोस्ट शेअर करत आलियाने लिहिले, लव्ह यू पापा, असे सांगितले आहे. या गाण्याचे शब्द कविवर्य गुलजार यांनी लिहिले असून प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने हे गायले आहे. गायिकेचा आवाज हृदयाला स्पर्शून जातो. गाण्यात वडील-मुलीचे सुंदर नाते दाखवले आहे. मुलीच्या पाठवणीचे हे गाणे भावूक करणारे आहे. गाण्यात कश्मिरी बोल वापरण्यात आले आहेत. एका साध्यासुध्या काश्मीरी मुलीची ही कथा आहे. जिला पाकिस्तानात हिंदुस्तानाचे डोळे आणि कान बनवून पाठवले जाते.