आलियावर ऑफरची बरसात

0

मुंबई- आलीय भट सध्या बॉलिवूडमधली आलियाची सुंदरता व अभिनय बघता तिला बॉलिवूडमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सध्या तिला बॉलिवूडमधून खूप ऑफर मिळत असून ओफरची जणू काय तिच्यावर बरसातच होत आहे. अक्षरश: आलीयाजवळ काम भरपूर आहे आणि वेळ कमी आहे अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे आलियाची बेस्ट फ्रेण्ड प्रचंड मोठी कतरिना कैफला मात्र दुष्काळी दिवस आले आहे. सध्या तिला कोणतेही ऑफर नाही. कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये काम मिळेनासे झाले आहे.

शुटिंगमध्ये बिझी असल्यामुळे आलियाकडे स्क्रिप्ट वाचण्यासाठीही वेळ नाहीय. म्हणूनच बिचाऱ्या आलियाला सलूनमध्ये स्क्रिप्ट वाचावी लागतेय. आलिया सलूनमधून बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एका सिनेमाची स्क्रिप्ट होती. त्यामुळे हा असा कोणता सिनेमा आहे की ज्याची स्क्रिप्ट आलिया सलूनमध्ये वाचत होती? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. आलिया सलूनमधून बाहेर येताच मीडियाला पोज देऊन लगेच कारमध्ये बसली… एक आलिया आहे जिला कामातून वेळ मिळत नाही आणि एक आहे आलियाची बेस्ट फ्रेण्ड जिच्याकडे वेळचं वेळ आहे.