धक्कादायक: हवाई दलाच्या विमान दुर्घटनेतील सर्वच्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू

0

ईटानगर: अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचे दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विमानाच्या अवशेषांपर्यंत बचाव पथक पोहोचल्यानंतर हवाई दलाने सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खातरजमा केली आहे. या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतही पोहोचवण्यात आली आहे. हवाई दलाने याबाबत ट्विट केले आहे.

तत्पूर्वी 15 सदस्याचे बचाव पथक आज सकाळी दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषापर्यंत पोहोचले. या बचाव पथकामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता. बचाव पथकाला एअरलिफ्ट करून विमानाच्या अवशेषांपर्यंत नेण्यात आले, त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप केले. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमान AN-32 अवशेष अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात दिसले होते.