देशात सर्वत्र वीज पोहोचली

0

नवी दिल्ली : अन्न,वस्त्र, निवार्‍या ज्या प्रमाणे मुलभूत गरजा आहेत त्याच प्रमाणे वीज देखील आज एक मुलभूत गरज बनली आहे. देशातील प्रत्येक खेड्या-पाड्यात वीज पोहचवणे हे सरकारचे उद्दिष्ट होते. 1000 दिवसांच्या आत देशातल्या सर्व खेड्यांमध्ये वीज पोहचण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घालून दिलेले उदिष्ट पूर्ण झाल्याची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितले आहे. नरेंद्र मोदींनी लाल किल्यावरील भाषणातून देशातील सुमारे 18 हजार गावांमध्ये वीज आणण्याचा संकल्प सोडला होता. तो पूर्ण झाल्याची माहिती मोदींनी दिली आहे. मणिपूरमधील लायसिंग हे वीज येणारे देशातील सर्वात शेवटचे गाव ठरले आहे.

देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टि्वटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोवरुन रविवारी युझर्सनी पियूष गोयल यांना मोठया प्रमाणात ट्रोल केले. गोयल यांनी रात्रीच्यावेळी उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेले भारताचे दोन फोटो टि्वटरवर पोस्ट केले होते. सर्व भागात वीज पोहोचल्यानंतर भारत आता कसा दिसतो व आधी कसा दिसायचा हे सांगणारे ते दोन फोटो होते. या फोटोंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ठरवलेल्या मुदतीआधीच भारताने सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य गाठले.