हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या अगोदर भारताने तीन सामने जिंकून मालिका ताब्यात घेतली आहे. दरम्यान आज चौथ्या वन डे सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करणारा संपूर्ण भारतीय संघ केवळ ९२ धावांत माघारी परतला. न्यूझीलंड विरुद्धची ही भारताची खराब कामगिरी असून न्यूझीलंड विरुद्ध भारताची ही दुसरी निचांक खेळी ठरली आहे.
भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर अक्षरश: शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ ९२ धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल (१८ नाबाद) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग १० षटकात ४ निर्धाव षटकांसह २१ धावा देत पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने २६ धावा देत ३ विकेट घेत ट्रेंट बोल्टला चांगली साथ दिली.
नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियम्सनने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. रोहित ७ तर धवन १३ धावावर बाद झाले.