नवी दिल्ली: कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक चिंतेचा सामना करावा लागत आहे. त्यातच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात देशातील एक दोन नव्हे तर तब्बल २४ बोगस विद्यापीठे बोगस असल्याचे समोर आले. त्यात सर्वाधिक उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील नागपुरातील एका विद्यापीठाचाही यात समावेश आहे.
यूजीसीने आपल्या अधिकृत संकेतस्थाळावर (ugc.ac.in ) देशातील बोगस २४ विद्यापीठाची यादी जाहिर केली आहे.
संसदीय अधिनियन आणि युजीसी कायद्यानुसार 24 संस्थांना विद्यापीठ शब्द वापरण्याचा अधिकार नाही. या विद्यापिठांनी बोगस विद्यापीठे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या विद्यापीठाने कायद्याचे उल्लघंन केल्यामुळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या २४ विद्यापीठांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा आधिकार नाही.
बोगस विद्यापीठांची यादी
कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्ली
युनाटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली
व्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली
एडीआर सेंट्रिक जूरीडिकल युनिव्हर्सिटी, एडीआर हाउस, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एंड इंजीनियरिंग, नवी दिल्ली
विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एंप्लॉयमेंट, संजय एंक्लेव, नवी दिल्ली
आध्यात्मिक विद्यापीठ (स्पिरिचुअल युनिव्हर्सिटी), रोहिणी, दिल्ली
बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, बेळगाव, कर्नाटक
सेंट जॉन युनिव्हर्सिटी, कृष्णाटम्, केरळ
राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर, महाराष्ट्र
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, चौरंगी रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल
इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेसिन एंड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल
वारणसेय संस्कृत विवि, वाराणसी, उत्तर प्रदेश / जगतपुरी, दिल्ली
महिला ग्राम विद्यापीठ / विवि (महिला विद्यापीठ), प्रयागराज, उत्तर प्रदेश
गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होम्योपैथी, कानपुर, उत्तर प्रदेश
नेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी (मुक्त विद्यापीठ), अलीगढ़, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश विद्यापीठ, मथुरा, उत्तर प्रदेश
महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ, प्रतापगढ़, उत्तर प्रदेश
इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद्, नोएडा, उत्तर प्रदेश
नव भारत शिक्षा परिषद्, राउरकेला, ओडिशा
नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर एंड टेक्नोलॉजी, मयूरगंज, ओडिशा
श्री बोधि एकेडमी ऑफ हायर एजुकेशन, पुडुचेरी
क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर, आंध्र प्रदेश