राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा !

0

मुंबई- राज्य सरकारकडून राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. घोषानेनुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आल्याने केंद्राची टीम लवकरच महाराष्ट्रात दाखल होऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येईल. दरम्यान दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी ज्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत त्यामध्ये जमीन महसुलातून सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या बिलात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कात सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे यांचा समावेश आहे.