मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

0

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयने सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आता सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय असून सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महिला पुरुष भेदाभेद नष्ट करणारा हा निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधने घातली जात आहे. देवाशी असलेले नाते हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी स्पष्ट केले. आहे. तसेच 10-50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन करणारे ठरेल. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी लिंगावरून भेदभाव करणे योग्य नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.