पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची धाडसी कारवाई
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील नव्याने आलेले पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी अवैधरीत्या बनावट दारू कारखानदारानां खाकी दाखवून मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राहुल लबडे, राजेंद्र माळी, पोलीस हेडकोन्स्टेबल भटुसिंग तोमर ,मिलिंद भामरे, शरद पाटील, सुनील हटकर, ईश्वर सोनवणे, सुनील पाटील, संजय पाटील, योगेश महाजन, किशोर पाटील, प्रमोद पाटिल, कैलास पवार, मधुकर पाटील, भूषण पाटील व महिला पोलीस कर्मचारी रेखा इसी यांच्या टीमने ही धाडसी कार्यवाही केली असल्याने अमळनेरात सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील धुळे रोड वरील भालेराव नगर व मंगरूळ विद्युतपारेषान केंद्राजवळील गेल्या काही कालावधी पासून सुरू असलेल्या हा कारखाना नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रुजू झाल्यापासून अवघ्या २४ तासात आपल्या सहकारी कर्मचार्यानं सह धाडसी कामगिरी बजावली.
बनावट दारूचा साठा जप्त
या कार्यवाहीत एक टाटा सुमो, एक प्याजो , चार मोटारसायकल, बनावट दारू बनवण्याचे रसायन, ब्रँडेड कंपनीच्या दारूच्या बाटल्या, खाली बाटल्या, बनावट दारूच्या बाटल्याचे स्टिकर, ड्रम अशा अंदाजे लाखो रुपयांचा माल हस्तगत केला. दरम्यान शहरासह तालुक्यात अनेक अवैद्यधंदे सुरू असल्याची चर्चा असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. तर याचा परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याने पालकांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या टीमचे कौतुक केले. अमळनेरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री होत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी) मूग गिळून बसली आहे का ? असा सवाल अनेक सुज्ञ नागरिक विचारीत आहे. याबाबत उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.