दोनशे कर्मचार्यांची गरज
अमळनेर (सचिन चव्हाण)– अमळनेर शहरासह तालुक्याच्या लोकसंख्येचा आढावा घेतला तर लोकसंख्या ही सुमारे चार ते पाच लाख आहे. लोकसंख्येच्या निकषावर तालुक्यातील पोलीस यंत्रणेतील पोलीस कर्मचारी यांची संख्या २०० हून अधिक आहे. मात्र अमळनेर पोलीस ठाण्यात तपास केला असता मोजक्या कर्मचार्यांच्या बळावर चार ते पाच लाख लोकसंख्येचा रक्षणार्थ आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे.
सणाला उत्सवाला कुठेही गालबोट लागु नये म्हणुन हे पोलीस कर्मचारी अतिशय काटेकोरपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात. लोकांमध्ये पोलीस खात्याविषयी अतिशय संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे आहे. अमळनेर तालुक्यातील ९२ खेडी व शहरासह सुमारे चार ते पाच लाख लोकसंख्येच्या रक्षणाची जबाबदारी ही अमळनेर पोलिसांची आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना २०० हून अधिक कर्मचार्यांची गरज आहे.
शासनाकडून मान्यता असुनही पदांची भरती नाही
शासनाकडून १०१ पोलीस कर्मचारी मान्यता असून एक पोलीस निरीक्षक १ सहाय्यक पोलीस निरीक्षक २ पोलीस निरीक्षक असे मनुष्यबळ असून मोजक्या ६३ पोलीस कर्मचार्यांच्या बळावर हे अधिकारी ४ ते ५ लाख लोकांच्या रक्षणाची एवढी मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. सण उत्सव आले की त्यांची ही जबाबदारी दुपटीने वाढते. लोकप्रतिनिधी राजकिय नेते मंडळी विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच जनता या सर्वांना प्रशासन अगदी शिस्तबद्ध व मनमिळावू वृत्तीने सांभाळून घेत आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काही विकृती असलेल्या व्यक्तींकडून बाधा आलीच तर त्याला वठणीवर आणायला देखील हे सज्ज असतात. रात्री अपरात्री कुठे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पोलीस गस्तीवर असतात व लोकांच्या रक्षणासाठी असे काही चुकीचे प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करत असतात. तरी शासनाने त्वरीत यासंदर्भात दखल घेऊन वाढीव कर्मचार्यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.