नवी दिल्ली-ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इ-कॉमर्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या Amazon Prime या सेवेला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टने Flipkart Plus ही सेवा आजपासून लॉन्च केली आहे.
Amazon Prime साठी ग्राहकांना 999 रुपये एका वर्षासाठी भरावे लागतात. पण फ्लिपकार्टच्या या सेवेसाठी ग्राहकांकडून कोणतेही शूल्क घेणार नाही. उलट फ्लिपकार्टकडून ग्राहकांना Plus Coin दिले जातील. फ्लिपकार्टवरुन 250 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी केल्यानंतर आपोआप ग्राहकांना हे Plus Coin मिळतील. किमान 50 Plus Coin झाल्यानंतर Flipkart Plus च्या सेवेचा लाभ घेता येईल. या सेवेसाठी फ्लिपकार्टने मेक माय ट्रिप, बुक माय शो, झोमॅटो, हॉट स्टार आणि कॅफे कॉफी डे यांच्याशीही भागिदारी करण्यात आली आहे.