अ‍ॅमेझॉनचे संस्थापक घेणार घटस्फोट !

0

नवी दिल्ली : जगातील लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. याबाबत स्वत: जेफ बेजोस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

२५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांना चार मुले आहेत. मॅकेन्झी बेजोस या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या. न्यूयॉर्कमध्ये नोकरीच्या मुलाखतीवेळी जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांची पहिल्यांदा भेट झाली होती. याशिवाय, मॅकेन्झी बेजोस या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी ‘द टेस्टिंग ऑफ लूथर अलब्राइट’ आणि ‘ट्रॅप्‍स’सहित अनेक पुस्तके लिहिली आहेत.

जेफ बेजोस यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना 1994 मध्ये केली होती. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जेफ बेजोस यांच्याकडे137 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेजोस यांचे नाव आहे.