माऊंट मोनगानुई: विश्वचषकासाठी भारतीय संघ असा सराव करत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. यावेळी त्याची गोलंदाजी अवैध असल्यामुळे त्याच्यावर आयसीसीने आक्षेप घेतला. रायुडूची गोलंदाजीची शैली अवैध असल्यामुळे आयसीसीने एक गोलंदाज म्हणून त्याला निलंबित केले आहे. यानंतर रायुडूची चाचणी घेण्यात येणार आहे. रायुडू जर यामध्ये नापास ठरला तर त्याला यापुढे गोलंदाजी करता येणार नाही. पण यानंतरही रायुडूला जर बीसीसीआयने परवानगी दिली तर तो स्थानिक सामन्यांमध्ये गोलंदाजी करू शकतो.