मुंबई : भारतीय संघातीलमधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय आज बुधवारी ३ रोजी जाहीर केला. याबाबत त्यांनी बीसीसीआयला पत्र पाठविले आहे. अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, आत्र वर्ल्ड कपपासून रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे. त्याने विजय शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती. ३३ वर्षीय रायुडूने ५५ वन डे सामन्यांत १६९४ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतके व 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
रायडूने भारताकडून ६ ट्वेंटी-20 सामन्यांत ४२ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ९७ सामन्यांत ४५.५६ च्या सरासरीने ६१५१ धावा कुटल्या आहेत आणि त्यात १६ शतके व ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने १६० सामन्यांत ५१०३ धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या २१६ ट्वेंटी-20 लढतीत ४५८४ धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे.