नंदुरबार प्रतिनिधी । धडगाव आणि कला तालुक्यातील आदिवासी बांधवांचा “आर्थिक आधार ठरणारा आमचूर उद्योगाला दा अवकाळीने ब्रेक लावला आहे. या वर्षीच्या वातावरणातील बदलाने व चामुळे झाडावरचा मोहोर आणि कैन्या गळून पडत असल्याने उद्योग मंदा महिनाभर लांबणीवर पडला आहे. यातून आंबा उत्पादकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. सातपुडयाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातील आंबा व आमचूर उद्योग हा नंदुरबारमध्ये नाही तर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आमचूर देवरायांचे काप तयार करून त्या उन्हात सुकवत त्याचे आमचूर तयार करतात. हा उद्योग मे महिन्यापासून सुरू होतो. गाव व अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी तयार केला जाणारा माल राजस्थान, गुजरात आणि उत्तर भारतात पाठविण्यात येतो. यातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. कोरोनाच्या दोन वर्षात व्यापारी व आल्याने आंबा उत्पादकांचे नुकसान झाले होते.
कैन्या गळण्याचे प्रमाण कायम राहिल्याने हंगाम पडला लांबणीवर
हरलेल्या मोहोरमुळे आंबा हंगाम चांगला जाणार अशी अपेक्षा असताना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्याने मोहर छोट्या आकाराच्या या सळून पडल्याने परिणामी आमचूर हंगाम सुरु झालेला नाही. सलग १५ दिवस वातावरणातील बदल कायम राहिल्याने याचे प्रमाण कायम राहिल्याने हंगाम लांगणीवर पडला आहे. नवीन या येण्यासाठी किमान २० दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतरच कैरी तोडून तिचे काप बनवत आमचूर बनवणे सुरू होण्याची शक्यता आहे.
येत्या काळात दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता ॐ प्रारंभीच्या काळात झालेल्या नुकसानीमुळे नंतर येणारे उत्पादन १५ ते २० टक्के राहील असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बियासाठी घरातील लासाठी आधार ठरणारा उद्योग सतवा गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांकडून दरवेळेस आमचूर प्रकल्पाच्या खोट्या आशा दिल्या जातात पण कोणीही आमचूर प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही. आव धडगाव आजारात आमचूर सध्या १५० १८०, २६० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होत आहे. दरांमध्ये येत्या काळात पाइ होणार असल्याचे सस्थितीला चित्र दिसत आहे.