नवी दिल्ली- अमेरिका आणि चीनमधील व्यवसायात मंदी आल्याने पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपति डोनॉल्ड ट्रम्प यांनी चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ५० अरब डॉलर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात मंदी आली आहे. हैवीवेट ओएनजीसी, एचडीएफसी बँक, आईटीसी, एसबीआई, एचयूएल, मारुति सुजुकी आणि एचडीएफसी या क्षेत्रातील शेअर खाली आले आहे. रिलायंस इंडस्ट्रीज, टीसीएस, इंफोसिस, सन फार्मा या क्षेत्रातील शेअरमध्ये वाढ होत आहे.
सद्य स्थितीत सेंसेक्स १७२ अंकांनी खाली येऊन ३५ हजार ४२७ तर निफ्टी ४५ अंकांनी खाली येऊन १० हजार ७६३ अंकावर आले आहे.