ट्रम्पच्या धोरणामुळे मतभेत झाल्याने संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

0

न्युयोर्क-राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर पररराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने सरंक्षण मंत्री जीम मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधून अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मॅटिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ट्रम्प यांच्यावर या निर्णयामुळे चौफर टीका होत आहे.

सीरियामध्ये इसिसचा पाडाव झाला आहे असा ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सीरियामध्ये दोन हजाराच्या आसपास तैनात असलेले सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

जीम मॅटिस उत्कृष्ट कामगिरी पार पाडून फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत. माझ्या प्रशासनात दोन वर्ष त्यांनी संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. जीम यांच्या कार्यकाळात प्रचंड प्रगती झाली असे ट्रम्प यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.