नवी दिल्ली- दिल्लीत २६ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रम्प यांच्या कार्यालयाकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये ट्रम्प यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्यामुळे खेद व्यक्त केला आहे. भारताने रशियासोबत केलेला संरक्षण करार आणि इराणकडून केलेली तेल आयात यामुळे नाराज ट्रम्प यांनी भारताचे निमंत्रण नाकारल्याचे म्हटले जात आहे.
२६ जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेत ट्रम्प जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांना भारतामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. विशेष म्हणजे २०१५ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील आपले सर्व कार्यक्रम सोडून भारताचे निमंत्रण स्विकारले होते. परंतु भारत आणि अमेरिकेच्या धोरणांमध्ये तणाव आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निमंत्रण नाकारले आहे.
प्रजासत्ताक दिनी डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता धूसर?