ग्वालियर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील ग्वालियर येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस व गांधी कुटुंबीयांवर सडकून टीका केली. मोदी सरकारने गरिबांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. मात्र अमेठीतील नामदारांचे कुटुंबीय विश्वस्त असलेल्या एका रुग्णालयात मात्र आयुष्यमान भारतच्या कार्डवर उपचार होत नाही. एक व्यक्ती या रुग्णालयात उपचारासाठी गेली तर त्याच्यावर सरकारने दिलेल्या कार्डवर उपचार केले गेले नाही. मोदींनी दिलेल्या कार्डवर उपचार होणार नाही असे सांगण्यात आल्याचे घणाघाती आरोप मोदींनी केले.
गांधी कुटुंबियांमध्ये मोदी सरकारबद्दल खूप द्वेष असून सामान्य लोकांना त्यासाठी वेठीस धरले जाते असे आरोप मोदींनी केले.