खऱ्या आयुष्यातही तो हिरो आहे!

0

मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान ऑनस्क्रिन हिरो तर आहेच, मात्र खऱ्या आयुष्यातही तो हिरो आहे हे त्याने दाखवून दिले आहे. आमिरने मध्यरात्री रुग्णालयात जाऊन त्याच्या ‘दंगल’ चित्रपटातील सहकाऱ्याचे प्राण वाचवले आहेत.

आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटातील साउंड इंजीनियर शाजीथ कोयरी याला पॅरालिसीसचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात भरती केले, मात्र बऱ्याच वेळापर्यंत डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार न केल्याने ही बाब त्याच्या परिवाराने आमिरला सांगितली. आमिर पटकन रुग्णालयात पोचला. तिथे त्याने त्याच्या सहकाऱ्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले, तसेच त्याचा रुग्णालयाचा संपूर्ण खर्चही उचलला.