नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे. या ओळखपत्रात पासपोर्ट, आधार आणि व्होटर आयडी कार्ड यांचा अंतर्भाव असणार आहे असे अमित शहा यांनी सांगितले आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची शिफारस करत 2021ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असल्याचे अमित शहांनी सांगितले.
आधार, पासपोर्ट, बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड यांसारख्या सर्व सुविधा एकाच कार्डात असणे आवश्यक आहे. त्यासाठीही अमित शाहांनी हा प्रस्ताव दिला आहे. एक अशी व्यवस्था असली पाहिजे, ज्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ऑटोमेटिक पद्धतीने त्याची माहिती लोकसंख्येच्या डेटामध्ये अपडेट होईल, आम्हाला एक असे कार्ड आणायचे आहे, जे सर्व गरजा जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट, बँक अकाऊंट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी पूर्ण करेल असे अमित शहा यांनी सांगितले.
जनगणना हे काही कंटाळवाणं काम नाही. त्यामुळे सरकारला योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर(NPR)च्या अनेक मुद्दे सोडवण्यासाठी सरकार मदत करते. हे देशातल्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. जनगणनेचं काम अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. देशात आता आधारच्या अनिवार्यतेवर चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव ठेवला आहे.