जेटलींच्या रूपाने एक मार्गदर्शक गमविला: अमित शहा

0

नवी दिल्ली: देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचे श्वास घेतले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण जेटली यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. परिवारातील सदस्य गेल्यासारखे दु:ख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एक मार्गदर्शक गमविल्याचे त्यांनी म्हटले आहे.