नवी दिल्ली-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत स्वत: शाह यांनी टि्वट करुन माहिती दिली आहे. दरम्यान आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांना पुढील एक-दोन दिवसात रुग्णालयातून सुट्टी देण्यात येईल असे भाजपने ट्वीटरवरून माहिती दिली आहे.
कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, अमित शहा बरे आहेत असे सांगण्यात आले आहे.
अमित शाह यांना अस्वस्थ वाटत होते. छातीमध्ये दुखत होते तसेच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनातपासणीसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी चाचणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांना शाह यांना दाखल करुन घेतले असून पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल अशी माहिती आहे.