नवी दिल्ली-भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भाजपाच्या मुख्यालयात आज ध्वजारोहण करण्यात आले. मात्र अमित शाह यांनी झेंडा फडकवण्यासाठी जेव्हा दोरी हाती घेतली तेव्हा आपला राष्ट्रध्वज खाली घरंगळत आला. तिरंगा खाली येणार तेवढ्यात अमित शाह यांनी दुसरी दोरी खेचली आणि झेंडा पुन्हा वर नेला व फडकवला. हा क्षण पाहून उपस्थितांचे मन भांड्यात पडले होते.
अमित शाह यांच्या हातून झेंडा निसटल्याने काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.
जो देश का झंडा नहीं संभाल सकते, वो देश क्या संभालेंगे?
50 साल से ज्यादा देश के तिरंगे का तिरस्कार करने वालों ने अगर ये नहीं किया होता तो शायद आज तिरंगे का ऐसा अपमान न होता।
दूसरों को देशभक्ति का सर्टिफिकेट देने वालों को राष्ट्रगान का तौर-तरीका तक पता नहीं। pic.twitter.com/FmiEI5B7D7
— Congress (@INCIndia) August 15, 2018
कॉंग्रेसनंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून भाजपावर टीका केली आहे. तिरंग्याने अमित शाह यांच्या हातून फडकणे पसंत केले नाही असेच हे संकेत आहेत. या तिरंग्याच्या माध्यमातून भारतमाता हे सांगते आहे की ती दुःखी आहे असे ट्विट करून केजरीवाल यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.