पटना-आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार यांची भेट घेतली. गुरुवारी सकाळी त्यांनी नितीशकुमार यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली. २०१५ मध्ये नितीशकुमार लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत युती करून मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी नंतर युती तोडून भाजपशी युती केली.
पटना में बिहार के मुख्यमंत्री व NDA में हमारे साथी, श्री @NitishKumar जी से भेंट की। pic.twitter.com/eH4giuF2HZ
— Amit Shah (@AmitShah) July 12, 2018
आगामी काळात मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची रणनीती भाजप आखत असल्याने अमित शहा यांनी आज नितीश कुमार यांची भेट घेतली.