मी जय श्रीराम म्हणतो, ममता दीदींनी मला अटक करून दाखवावे: अमित शहा

0

कोलकाता: काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या ताफ्यात जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांना झापले होते. तो धागा पकडत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमधील जोयनगर येथील प्रचार सभेत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. मी आज या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये येऊन जय श्रीरामाच्या घोषणा देतो, हिंमत असेल तर ममता दीदींनी मला अटक करून दाखवावे असे आव्हान अमित शहा यांनी दिले आहे. मी जोयनगर येथे जय श्रीरामाच्या घोषणा देऊन पुन्हा कोलकाता येथे जाणार आहे, कोलकाता येथे देखील मी जय श्रीरामाच्या घोषणा देणार आहे. हिंमत असेल तर ममता दीदींनी मला अटक करून दाखवावे असे अमित शहा म्हणाले.