अमित शहा यांच्यावर शस्त्रक्रिया !

0

अहमदाबाद:केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या छोटीशी मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अहमदाबादमधील के.डी रुग्णालयामध्ये शाह यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शाह यांच्या मानेच्या मागच्या बाजूला असणारी एक गाठ काढण्यात आले आहे. रुग्णालयाने पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.

‘आज बुधवारी ४ रोजी सकाळी नऊच्या सुमारास अमित शाह यांना के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मानेच्या मागील भागावर असणारी गाठ शस्त्रक्रिया करुन काढण्यात आली आहे. त्यांना रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे,’ अशी माहिती या पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी रात्रीच अमित शाह यांनी दिल्लीमध्ये जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये विकास कामाला प्राधान्य देण्यासाठी मोदी सरकार सर्व मदत करण्यास तयार असल्याचे यावेळी शाह यांनी स्पष्ट केले होते.