मुंबई: जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांना सर्वोच्च दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिलिया आहे. आपल्या दमदार अभिनयाने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रपटांसाठी व्यतीत केले आहे.
त्यांच्या या कार्यासाठी त्यांची ‘दादा साहेब फाळके पुरस्कारा’ साठी एकमताने निवड करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांनी यांनी ट्वीट करत अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे.
जेष्ठ अमिताभ बच्चन यांनी मनोरंजन क्षेत्रातील दोन पिढ्यांना प्रेरणा दिली आहे असे जावडेकर म्हणाले. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बच्चन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.