बेळगाव-देशातील प्रसिद्ध अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०) रा. विजय नगर, बेळगाव)यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. त्यांच्या आत्म्हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. अमृत मलम, अमृत फार्मा आदी कंपनीचे ते संचालकही होते. रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने छातीवर गोळी झाडली. गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या पाहणी दरम्यान शैलेश यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अमृत मलममुळे अमृत फार्माची उत्पादने घरोघरी पोहोचली आहेत.