अमृतसर दुर्घटना: रावणाची भूमिका करणाऱ्याने स्वत:चे जीव देत वाचविले ८ जणांचे प्राण

0

अमृतसर : अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहनाचा कार्यक्रमा पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. दरम्यान रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. परंतू त्याने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आठ जणांचे प्राण वाचवले. त्याच्या या शौर्याची चर्चा होत आहे.