माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मृतदेह घेऊन जावे लागले खांद्यावर

0

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश राज्यातील बदायू येथील जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी महिलेच्या पतीने केली. मात्र दोन दोन रुग्णवाहिका त्या ठिकाणी असतांना देखील मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्या उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. शेवटी पतीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले.

ही बाब डीएम यांना कळल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत रुग्णालयात संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु होती. मूसाझाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत हेणाऱ्या मझारा येथील रहिवाशी सादिक यांची पत्नी मनीषा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती.

सोमवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी थाना क्षेत्र के ग्राम मझारा निवासी सादिक की पत्नी मनीषा जिला अस्पताल में भर्ती थी। सोमवार दोपहर इलाज के दौरान रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची मागणी केली. सादिक याने रुग्णवाहिका मिळावी यासाठी सीएमएस डॉ. आरएस यादव यांना लेखी अर्ज देखील दिला. मात्र तरीही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही.