शिंदखेडा महसूल कार्यालयाचा उपक्रम

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्कार

शिंदखेडा (प्रतिनिधी)येथील शिंदखेडा तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील होते.

महसूल दिनाच्या निमित्ताने कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुंदर माझे कार्यालय या संकल्पने अंतर्गत कार्यालयीन स्वच्छता केली. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधीनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत प्रकरणांच्या निपटारा केला. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .त्यात बी.डी.वाडीले डी.पी.चव्हाण , एस.एस.वळवी, पी.के.धनगर , सोनल थोरात, टी.के.पवार , एम.व्ही.गोसावी , बी.एल. बाविस्कर , के.आर.पाटील , रवींद्र बैसाणे , पोलीस पाटील भैय्या नगराळे, व कोतवाल खलाणे यांचा सत्कार करण्यात आला.छोटू चौधरी यांनी आभारप्रदर्शन केले.