भुसावळ : अनोळखी तरुणाने तापी पात्रात उडी मारत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. यावल रोडवरील तापी तापी नदीत एका युवकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास उडी घेतल्यानंतर शहरचे उपनिरीक्षक अंबादास पाथरवट व दीपक सेवरे यांनी धाव घेतली.
अत्यवस्थ अवस्थेत उपचार सुरू असताना मृत्यू नदीत पडलेल्या युवकाला अन्य लोकांच्या मदतीने बाहेर काढले असतो त्यावेळी युवक जिवंत होता मात्र अधिक मार लागल्याने तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने ट्रामा केअर सेंटरला हलविण्यात आले असता दोन्ही पाय फॅक्चर झाल्याने त्यास जळगाव येथे हलविण्यात आले असता उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या पोटावर चिकटपट्टी चिकटवली आहे. कोणास काही माहिती असल्यास शहर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन उपनिरीक्षक अंबादास पाथरवट यांनी केले आहे.