शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीची दिनांक 12 रोजी सकाळी नऊ वाजता आशापुरी देवी पाटण “येथील सभागृहात तातडीची बैठक –
शिंदखेडा ( प्रतिनिधी) —
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार केंद्र शासनाचे नऊ वर्षाच्या कामगिरीबद्दल “नऊ वर्ष नऊ प्रश्न “हे अभियान राबविणे तसेच पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मतदार संपर्क अभियान अंतर्गत “अ “-ग्राम काँग्रेस कमिटी स्थापन करणे प्रभाग” ब” ग्राम काँग्रेस कमिटी स्थापन करणे , “ड” बुध कमिट्या स्थापन करणे, तालुक्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, महिला ,युवक, बेरोजगार निराधार व्यक्तींवर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याबाबत रूपरेषा ठरविण्यासाठी शिंदखेडा तालुका काँग्रेसची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जिल्हा नेते आदरणीय बाबासाहेब कुणाल जी पाटील धुळे जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली व मतदार संपर्क अभियानाचे “निरीक्षक श्री प्रदीप राव धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. तरी दिनांक 12 सोमवारी सकाळी नऊ वाजता आशापुरी देवी पाटण येथे सभागृहात बैठकीस तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे अशी विनंती शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी केली आहे”