चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत:ला विषाचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. डॉ.शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. विकास आणि भारती आमटे यांच्या त्या कन्या तर प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या त्या नात होत्या.