मुंबई- भारत आणि वेस्ट इंडीजसंघात आजपासून पहिला २०-२० सामना खेळला जात आहे. दरम्यान वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याची दुबईहून भारतात येण्यासाठीची फ्लाईट चुकली असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे. वेस्ट इंडीज संघात आंद्रे रसेलचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे पाहुण्या संघासाठी रसेलचे असणे गरजेचे आहे.