वरणगाव- शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पर्यवेक्षिका कल्पना विलास तायडे (कोसोदे) यांच्याविरुद्ध वरीष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा पवित्रा घेतल्यानंतर तायडे यांनी आपल्या जीवाचे आपण काही बरे-वाई करून घेऊ, अशी धमकी दिल्यानंतर शहरातील सर्व अंगणवाडी कर्मचार्यांनी वरणगाव पोलिसात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. अंगणवाडी सेविका शारदा राजू तायडे (49, रा.फेकरी, ता.भुसावळ) व पुष्पा रवींद्र चौधरी (रा.वरणगाव) यांना पर्यवेक्षिका कल्पना तायडे (रा. आनंद नगर, भुसावळ) यांनी 1 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान मोबाईलवर सांगितले की , जर माझ्या विरुध्द वरीष्ठांकडे तक्रार केल्यास मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईल व त्यास जवाबदार तुम्हीच राहणार, असे सांगत मोबाईल कट केला. धमकी दिली म्हणून वरणगाव पोलिसात पर्यवेक्षिका कल्पना तायडे यांच्याविरूध्द भादंवि कलम 507 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.