नवी दिल्ली-अनिल कपूर, सलमान खान, जॅकलीन फर्नांडीस, बॉबी देवोल यांची मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट रेस३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते सलमान खान व कॅमेरामन अनिल कपूर असल्याचे ऐकून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. परंतू काही काळासाठी का होईना या चित्रपटाचे निर्माते सलमान खान तर कॅमेरामन अनिल कपूर बनले. चित्रपटाची शुटींग सुरु असतांना अनिल कपूर कॅमेरा घेऊन शुटींग करीत आहे तर सलमान खान कशा पद्धतीने शुटींग करायचे याबाबत मार्गदर्शन करीत दिसून येते. चित्रिकरणादरम्यान संपूर्ण रेस३ ची टीम मौज करत असल्याचे दिसून येते.