अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गावागावात करण्यात आले होते
। मुक्ताईनगर प्रतिनिधी ।
सामुराबादमध्ये यावर्षी सुद्धा मानुमान या जयंतीनिमित्त आले होते. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भंडाऱ्याचे कार्यक्रम करण्यात आलेले होते. मुक्ताईनगर मधील हनुमान मंदिरांमध्ये विधिवत पूजा अर्चना करून हनुमान जयंती उत्सव समितीतर्फे श्रीराम भक्त हनुमान तसेच सेवक वानर सेनेचा सजीव देखावा साकारण्यात आलेला होता. या सजीव देखाव्यांचे मुक्ताईनगरमधून रॅलीला सुरुवात करून ही रॅली पुढे प्रवर्तन चौक मार्गे पंचक्रोशीतील तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत हनुमान मंदिर शिरसाळा (ता. बोदवड) याठिकाणी पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मुख्य आकर्षण असलेला सजीव देखावा बघण्यासाठी मुक्ताईनगर तालुका वाशी प्रवर्तन चौकामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सजीव देखाव्याची संपूर्ण तालुक्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने श्रीराम भक्त हनुमान भक्त युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बजरंग बली की जय, जय श्रीराम आदी घोषणांनी युवकांनी मुक्ताईनगर शहर दणाणून सोडले. ही रॅली पुढे शिरसाळा मारती याठिकाणी मार्गस्थ झाली.
फैजपुरात विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा
फैजपूर । शहरांमध्ये विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे बुधवारी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे सायंकाळी ४ वाजता भव्य दिव्य हनुमान जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी पहाटे ६ वाजता हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वकारे यांच्या हस्ते त्रिवेणी वाडा येथील हनुमान मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. तसेच गावातील मोठे मारुती मंदिरात कल्पेश खत्री यांच्याहस्ते हनुमानाची विधिवत पूजा करण्यात झाली. तसेच शहरातील विविध मंदिरांमध्ये आज सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली आज सायंकाळी ४ निघणाऱ्या हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
फैजपुरात विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा
फैजपूर । शहरांमध्ये विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे बुधवार दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे सायंकाळी ४ वाजता भव्य दिव्य हनुमान जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी पहाटे ६ वाजता हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वकारे यांच्या हस्ते त्रिवेणी वाडा येथील हनुमान मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली.